अजब ! लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांना रामाचे नाव लिहिण्याची शिक्षा
देश बातमी

अजब ! लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांना रामाचे नाव लिहिण्याची शिक्षा

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना देशातल्या बहुतांश राज्यांमध्ये लॉकडाउन लावण्यात आले आहे. तरीही काही नागरिक लॉकडाउनच्या नियमाचं उल्लघंन करत रस्त्यावर फिरत आहेत. मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात लॉकडाउनचे नियम तोडणाऱ्या नागरिकांना शिक्षा देण्यासाठी एका पोलीस उपनिरीक्षक नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून कागदावर रामाचे नाव लिहून घेत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्या व्यक्तीकडून चार ते पाच पानांवर रामाचे नाव लिहून घेतले जाते त्यानंतर त्याची सुटका करण्यात येते असे सतना जिल्ह्यातील कोलगवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष सिंह यांनी सांगितले. पोलिसांनी गेल्या काही दिवसांमध्ये नियम मोडणाऱ्या नागरिकांना पकडून ३० ते ४० मिनिटे त्याच्यांकडून रामाचे नाव लिहून घेतण्याचा उपाय सुरु केला आहे.

जिल्ह्यात करोना कर्फ्यूची कडक अंमलबजावणी करण्यासाठी २० चेक पॉईंट्स तयार करण्यात आल्याचे उपनिरीक्षक संतोष सिंह यांनी सांगितले. ही शिक्षा देण्यासाठी जवळच्या नागरिकांनी त्यांना काही वह्यासुद्धा दिल्या आहे. यापूर्वी आम्ही नियम मोडल्याची शिक्षा म्हणून उठा बश्या काढायला सांगत किंवा तासभर बसून नंतर सोडून देत असत. मला वाटले की ते नुसते बसण्यापेक्षा त्याऐवजी भगवान रामाचे नाव लिहू शकतात. त्यामुळे आम्ही ही शिक्षा सुरू केली. त्यानंतर बाहेर फिरणाऱ्यांना आम्ही घरात बसून पालकांची काळजी घेण्याची सक्त ताकीद देतो, असे संतोष सिंह यांनी सांगितले.