महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनामुळे निधन; कुंभमेळ्यात झाले होते सहभागी
देश बातमी

महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनामुळे निधन; कुंभमेळ्यात झाले होते सहभागी

हरिद्वार : निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे. हरिद्वार येथील कुंभमेळ्यात ते मध्यप्रदेशहून आले होते. महामंडलेश्वर कपिल देव हे कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यावर त्यांना देहरादून येथील कैलाश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणीच त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कुंभमेळ्यात नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाले. मागील ७२ तासांमध्ये दीड हजारांहून अधिक पॉझिटिव्ह केसस केवळ हरिद्वार कुंभ मेळा परिसरातू समोर आल्या आहेत. शिवाय अनेकांचा मृत्यूदेखील झालेला आहे. कोरोनाबाधितांची संख्या आता आणखी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा दिलेला इशारा धुडकावून बुधवारी हजारो साधूंनी हरिद्वारमधील हर की पैरी येथे गंगा नदीत कुंभमेळ्यातील तिसरे शाहीस्नान केले. सामाजिक अंतराच्या नियमांची पायमल्ली करून दुसऱ्या शाहीस्नानालाही साधूंसह अन्य भाविकांनी गर्दी केली होती.