राज्यातील नव्या कोरोनाग्रस्तांची घटली संख्या; २७ मृ्त्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील नव्या कोरोनाग्रस्तांची घटली संख्या; २७ मृ्त्यू

मुंबई : राज्यातील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आज मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. आज दिवसभरात २ हजार ७४० नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. ही फेब्रुवारी महिन्यांपासूनची सर्वात निच्चांकी संख्या आहे. तर ३ हजार २३३ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, २७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख ०९ हजार २१ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०५ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६५ लाख ६१७ झाली आहे. आजपर्यंत राज्यात १ लाख  ३८ हजार १६९ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ६० लाख ८८ हजार ११४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ६१७ (११.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९९ हजार १९२ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. तर १ हजार ८८३ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४९ हजार ८८० अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.