महाराष्ट्र बंदचा तुमच्या जिल्ह्यात काय परिणाम?
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्र बंदचा तुमच्या जिल्ह्यात काय परिणाम?

मुंबई : लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज, सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या बंदला सकाळपासून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र बंदचा परिणाम मोठ्या प्रमाणात वाहतूकीवर परिणाम होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून या बंदला उर्त्स्फुत प्रतिसाद मिळताना दिसत तुमच्या जिल्ह्यात काय परिणाम झाला आहे?

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुणे बंद
पुणे शहराच्या मध्य वस्तीत कडकडीत प्रतिसाद मिळालेला दिसत असला तरी उपनगरामध्ये मात्र सर्व व्यवहार सकाळी तरी सुरळीत सुरु असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या बंदला पाठिंबा दिला आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते प्रामुख्याने सकाळपासून रस्त्यावर उतरलेले दिसून येत आहे. ज्या ठिकाणी दुकाने उघडी दिसतात, त्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करताना दिसून येत आहे. गुलटेकडी मार्केटयार्ड बंद ठेवण्याचा निर्णय हमाल, मापाडी, टेम्पो चालक संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे आज मार्केटयार्डमध्ये कोणतीही आवक झालेली नाही. पीएमपीएमएल व्यवस्थापनाने दुपारी १२ पर्यंत बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर बंदला चांगला प्रतिसाद
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे -बंगलोर महामार्गावर आंदोलन करुन रस्ता रोको केला. सकाळी सुमारे १० मिनिटे त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. महामार्गावरील वाहतूक रोखून धरली.
त्यानंतर पोलिसांनी या सर्व शिवसैनिकांना ताब्यात घेऊन रस्ता पुन्हा सुरु केला. महामार्गावरील वाहतूक अतिशय कमी आहे.

सांगलीत बंदला चांगला प्रतिसाद
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमिवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, दैनंदिन व्यवहार बंद करण्यात आले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहरात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने सुरू असून याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.

औरंगाबाद बंद
महाराष्ट्र बंदच्या हाकेनंतर गुलमंडी भागात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सातारा, देवळाई, उल्कानगरी, शिवाजीनगर परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद असून जीवनावश्यक साहित्याची दुकाने वगळता इतर व्यवहार बंद आहेत. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भाजीपाल्याची आवक नेहमी पेक्षा दहा ते वीस टक्क्यांनी कमी आहे.

नागपुरात बंद
नागपुरात विविध भागात काँग्रेस राष्ट्रवादी पार्टी तर्फे आंदोलन करण्यात आले. बाईक रॅलीसुद्धा काढण्यात आली. मात्र, व्यापाऱ्यांची या आंदोलनाला पाठ दाखवली आहे.

मुंबई बंद
काल मध्यरात्रीपासून आज सकाळी पहाटेच्या दरम्यान बेस्टच्या ८ बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोड करण्यात आली आहे. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बेस्टच्या व्यवस्थापनाने पोलीस संरक्षण मागवले असून परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व आगारातून बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.

अकोला शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद
अकोला जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीने बंदच आवाहन केलं आहे. दरम्यान अकोला शहरात मात्र या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अकोला शहरात बसेस सुद्धा चालू आहे. बसस्थानकावर नागरिकांची वर्दळ पाहायला मिळाली आहे. महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला शहरी आणि ग्रामीण भागात किती प्रतिसाद मिळतो हे बघन गरजेचं आहे. अकोला शहरातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन शहरातून मोठी भव्य रॉली काढत व्यापारांना आपली प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलं आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारचा निषेध करत त्यांच्या विरोधात घोषणा देत बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

परभणीत बंदला संमिश्र प्रतिसाद
महाविकास आघाडीच्या बंदला परभणीत संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतो. अनेक दुकाने उघडी असून काहींनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली आहेत. थोड्या वेळात महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन करणार असल्याची माहिती आहे.

जालना बंद
जालना जिल्ह्यातही बंद ठेवण्यात येत असून जालना शहरातील मामा चौकातून महाविकास आघाडीच्या वतीने घोषणाबाजी करीत फेरी काढण्यात आली. या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी सहभागी होऊन बंदला पाठिंबा द्यावा यासाठी आज जालन्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी शहरातून मोर्चा काढला.

अमरावती शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद
अमरावती जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीने बंदच आवाहन केलं आहे. दरम्यान शहरात मात्र या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. शहरात बसेस सुद्धा चालू आहे . बसस्थानकावर नागरिकांची वर्दळ पाहायला मिळाली आहे. महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला शहरी आणि ग्रामीण भागात किती प्रतिसाद मिळतो हे बघन गरजेचं आहे.