…तर राज्यात पुन्हा संपूर्ण कडक लॉकडाउन
बातमी महाराष्ट्र

…तर राज्यात पुन्हा संपूर्ण कडक लॉकडाउन

पुणे : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली असल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शाळा, कॉलेज सुरु करण्यासाठी सरकार सावध पावलं उचलताना दिसत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ठाकरे म्हणाले, ‘अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरू नका. नागरिकांनी कोणत्याही चिथावणी आणि आमिषास बळी पडून स्वत:च्या व इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करून घेऊ नये असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, कोविड काळात राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करणे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फार महागात पडू शकते.

अजूनही कोरोनाचं संकट टळलेलं नाही. ते आपल्याला टाळायचं आहे. आपण जर अशाच पद्धतीने गर्दी करत राहिलो, कोरोनाबाबतचे नियम पाळले नाही, तर कोरोनाची तिसरी लाट अपेक्षेपेक्षा आधी येईल. गेल्या वेळी आपल्याकडे असलेल्या ऑक्सिजनच्या साठ्यात विशेष काही वाढ झालेली नाही. त्यामुळे रुग्ण वाढले आणि असलेल्या साठ्यापर्यंत पोहोचलो, तर मात्र आपल्याला कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.