लव्ह मॅरेजनंतर दुसरीवर जीव जडला, पुण्याच्या तरुणाने बायकोला संपवण्यासाठी निवडली अघोरी पद्धत
पुणे बातमी

लव्ह मॅरेजनंतर दुसरीवर जीव जडला, पुण्याच्या तरुणाने बायकोला संपवण्यासाठी निवडली अघोरी पद्धत

पुणे : पुण्यातल्या मुळशी तालुक्यातून एका भयानक घटना समोर आली आहे. पहिला प्रेम विवाह (Love Marriage) झालेला असतानाही तरुणाचा दुसऱ्या मुलीवर जीव जडला. तिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्याने पत्नीचा खून (Wife Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचे बीपी आणि शुगर कमी होऊन त्रास व्हावा, यासाठी पतीने भूल देण्याचे औषध जबरदस्ती देऊन तिचा खून केल्याचं उघडकीस आलं आहे. संबधित महिलेचा पती हा एका खाजगी रुग्णालयात परिचारक म्हणून काम करत होता. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेतील (Pune Crime News) आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

स्वप्नील विभिषण सावंत (वय २३, रा. सांगवी, ता. आष्टी, जि. बीड) असे या पतीचे नाव आहे. प्रियांका क्षेत्रे (वय २२ वर्ष) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. पतीने निवडलेली अघोरी पद्धत पाहून पोलीसही चक्रावून गेले.

लव्ह मॅरेजनंतर दुसरीवर जीव जडला

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुळशी तालुक्यातील घोटवडे फाटा येथे एका खासगी रुग्णालयात स्वप्नील हा परिचारक म्हणून कामाला होता. त्याचा प्रियांका क्षेत्रे नावाच्या मुलीशी प्रेम विवाह देखील झाला होता. लग्नानंतर ते दोघेही कासार आंबोली येथे भाड्याची खोली घेऊन राहत होते.

दरम्यानच्या काळात स्वप्नीलचे तो काम करत असलेल्या रुग्णालयातील परिचारिका तरुणीसोबत प्रेम संबंध जुळले. मात्र पहिले लग्न झाले असताना दुसरे लग्न करणार कसे या प्रश्नाने त्याला सतावून सोडले होते.

त्यानंतर स्वप्नील हॉस्पिटलमधून बीपी आणि शुगरचे इंजेक्शन आणून तिला जबरदस्ती देत राहिला. त्याने तिला त्रास देऊन तिला घरातच मारुन टाकले. तिला उपचारासाठी नेत असल्याचा खोटा बनाव केला. मात्र डॉक्टरांना याचा संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. याबाबत प्रियांकाच्या कुटुंबीयांनी स्वप्नील विरुद्ध मानसिक छळाचा गुन्हा दाखल आहे.

स्वप्नील हा प्रियांकाला संपवण्यासाठी हॉस्पिटलमधून गुपचूप औषधे नेत होता. तिला बीपी शुगरचा त्रास नसतानाही तिला ती इंजेक्शन देऊन त्याने मारून टाकले, असे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पौड पोलिस करत आहेत.