ब्रेकिंग! मराठा समाजासाठी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मार्ग मोकळा; सरकारने काढला जीआर
बातमी महाराष्ट्र

ब्रेकिंग! मराठा समाजासाठी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मार्ग मोकळा; सरकारने काढला जीआर

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना 10 टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात 10% आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याबरोबर सरळ सेवा भरतीतही मराठा उमेदवार आरक्षणाचा 10% लाभ घेऊ शकणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण रद्द झाल्यावर मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून तसा अध्यादेश राज्य सरकारने जारी केला आहे.