राज्यात पुन्हा उच्चांकी आकडा; दिवसभरात ३६ हजार ९०२ कोरोनाबाधित
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा उच्चांकी आकडा; दिवसभरात ३६ हजार ९०२ कोरोनाबाधित

मुंबई : राज्यातील कोरोना प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. दररोज कोरोनाबाधितांची उच्चांकी आकडे समोर येत आहेत. दररोज मोठ्या संख्येने नवीन कोरोना बाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिवसभरात राज्यात ३६ हजार ९०२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर ११२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ५३ हजार ९०७ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील मृत्यू दर २.४ टक्के आहे. राज्यात सध्या २ लाख ८२ हजार ४५१ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

त्याचबरोबर मागील २४ तासांत १७ हजार १९ जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला. आतापर्यंत राज्यात २३ लाख ५६ जण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८७.२ टक्के आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या १,९०,३५,४३९ नमुन्यांपैकी २६,३७,७३५ नमूने (१३.८६ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात १४,२९,९९८ जण गृह विलगीकरणात आहेत. तर १४ हजार ५७८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.