गृहमंत्र्यांना कोरोनाची लागण; ट्विट करून दिली माहिती
कोरोना इम्पॅक्ट बातमी

गृहमंत्र्यांना कोरोनाची लागण; ट्विट करून दिली माहिती

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन देशमुख यांनी ट्वीट करुन केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल. अशा आशयाचे ट्वीट अनिल देशमुख यांनी केले आहे.

दरम्यान, आतापर्यंत देशातील अनेक राजकीय व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्यातीलही जितेंद्र आव्हाड, अजित पवार, धनंजय मुंडे, अशोक चव्हाण आदी मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्याचबरोबर अनेक स्थानिक नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. अशात आता अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे.