कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढाकलली एमपीएससी परीक्षा
बातमी महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढाकलली एमपीएससी परीक्षा

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजना करत आहे. तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आह.

दरम्यान, कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल. येत्या दोन दिवसात प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल. जिथे आवश्यक आहे तिथे कडक लॉकडाऊन करावं लागेल.

तसेच, नागरिकांना विनंती आहे की, सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक फिरणे टाळा आणि मास्क वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. नागपूर शहरात 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. नागपूर मनपा हद्दीसह कामठी, हिंगणा आणि वाडी हे तीन भाग पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत आहेत, तेथेही लॉकडाऊन असणार आहे.