कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला; मृतांच्या आकड्यातही वाढ

मुंबई : राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असतानाच कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पहिल्यांदाच राज्यात रुग्णसंख्या वाढल्याचं दिसून आलं आहे. गुरुवारी राज्यात १२ हजार २०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. हा आकडा गेल्या काही दिवसांमध्ये १० हजारांच्या घरात आला होता. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५८ लाख ७६ हजार ०८७ इतकी झाली आहे. यापैकी १ लाख ६० हजार ६९३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू करून ५ दिवस उलटले असून आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढला आहे. राज्यात आज एकीकडे नवे कोरोनाबाधित वाढले असले, तरी दुसरीकडे ११ हजार ४४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा आता ५६ लाख ८ हजार ७५३ इतका झाला आहे. त्यामुळे अजूनही राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या वरच असून तो ९५.४५ इतका नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या वर असताना आज राज्यात मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बुधवारी राज्यात २६१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. आज हा आकडा वाढून ३९३ इतका झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर १.७७ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत राज्यात कोरोनामुळे १ लाख ३ हजार ७४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *