राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट; मृतांचा आकडाही कमी
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट; मृतांचा आकडाही कमी

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसत आहे. मागच्या २४ तासात केवळ १५ हजार २२९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २५ हजार ६१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आतापर्यंत एकूण ५४ लाख ८६ हजार २०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४.७३ टक्के एवढं झालं आहे. तर राज्यात एका दिवसात ३०७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.६८ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या २ लाख ४ हजार ९७४ सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

राज्यात आजपर्यंत ३ कोटी ५७ लाख ७४ हजार ६२६ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५७ लाख ९१ हजार ४१३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर १६.१९ टक्के इतका आहे. राज्यात सध्या १५ लाख ६६ हजार ४९० रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ७ हजार ५५ रुग्ण हे संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.