राज्यात दिवसभरात जवळपास ३०हजार नव्या रुग्णांचाी नोंद; तर एवढ्या रूग्णांचा मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात दिवसभरात जवळपास ३०हजार नव्या रुग्णांचाी नोंद; तर एवढ्या रूग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी स्थिर झाल्याचे चित्र दिसत असले तरी नव्या रुग्णाचा आकडा कमी होताना दिसत नाही. राज्यात आज दिवसभरात २९ हजार ६४४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर, ४४ हजार ४९३ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ५५५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ५० लाख ७० हजार ८०१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९१.७४ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ८६ हजार ६१८ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी २४ लाख ४१ हजार ७७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५ लाख २७ हजार ०९२ (१७.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७ लाख ९४ हजार ४५७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २० हजार ९४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३ लाख ६७ हजार १२१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.