महाराष्ट्रात दिवसभरात ५८ हजार ९२४ कोरोनाबाधित; तर एवढ्या रुग्णांचा मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

महाराष्ट्रात दिवसभरात ५८ हजार ९२४ कोरोनाबाधित; तर एवढ्या रुग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ५८ हजार ९२४ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ३५१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर सध्या १.५६ टक्के एवढा आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर, आज ५२ हजार ४१२ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३१ लाख ५९ हजार २४० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.०४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ४० लाख ७५ हजार ८११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३८ लाख ९८ हजार २६२ (१६.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३७ लाख ४३ हजार ९६८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७ हजार ०८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६ लाख ७६ हजार ५२० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १५ दिवसांसाठी संचारबंदीचीदेखिल घोषणा केलेली आहे. मात्र, तरी देखील रूग्ण संख्या कमी होत नसल्याने, आता राज्यात कडक लॉकडाउन लावला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच याबबात मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असे विजय वडेट्टीवार यांनी आज (ता. १९) यांनी सांगितले आहे.