दिलासादायक ! राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यांत पुन्हा घट
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यांत पुन्हा घट

मुंबई : राज्यात कोरोनाचे आकडे दररोज कमी जास्त होताना दिसत आहेत. मागील २४ तासांच्या तुलनेत आज (ता. २०) नवीन कोरोनाग्रस्तांच्या सं ख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. आज दिवसभरात राज्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांपेक्षा दुपटीहून अधिक जण कोरोनामुक्त झाल्याचे समोर आले आहे. राज्यभरात आज दिवसभरात १३ हजार ५१ रूग्ण कोरोनातून बरे झाले, तर ६ हजार १७ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. याशिवाय ६६ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ५९ लाख ९३ हजार ४०१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३५ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ५६ लाख ४८ हजार ८९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख २० हजार २०७ (१३.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६१ हजार ७९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार ०५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९६ हजार ३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.