राज्यातील मृत्यूचा आकडा घटला; तर दिवसभरात ६ हजार ८४३ नवे कोरोनाबाधित
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील मृत्यूचा आकडा घटला; तर दिवसभरात ६ हजार ८४३ नवे कोरोनाबाधित

मुंबई : राज्यात आज दिवसभरात ६ हजार ८४३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले, तर १२३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याबरोबर ५ हजार २१२ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. मात्र कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे आज पाहायला मिळाले असून दिवसभरात १२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख ३५ हजार ०२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ६८ लाख ४६ हजार ९८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ६४ हजार ९२२ (१३.३७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख १७ हजार ३६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३ हजार ५०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९४ हजार ९८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.