कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात दिवसभरात ९ हजारांहून अधिक रुग्णांची वाढ;; १२३ मृत्यू

मुंबई : राज्यात आज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही नवीन आढळून आलेल्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कमी असल्याचे समोर आले आहे. मागील २४ तासांत राज्यात ९ हजार ३३६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ३ हजार ३७८ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, राज्यात आज १२३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ५८ लाख ४८ हजार ६९३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.९१ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत १ लाख २३ हजार ०३० कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी २५ लाख ४२ हजार ९४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०लाख ९८हजार १७७ (१४.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ३८ हजार ४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४ हजार १९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १ लाख २३ हजार २२५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *