CoronaVirus : राज्यात आजही आकडा १०हजारांच्या पार
कोरोना इम्पॅक्ट बातमी

CoronaVirus : राज्यात आजही आकडा १०हजारांच्या पार

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव आता परत झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत देखील मोठी वाढ होत आहे. शिवाय, मृत्युंच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. आज(ता. ०६) राज्यात १० हजार १८७ नवीन कोरोनाबाधित वाढले असुन, ४७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या राज्यातील मृत्यूदर २.३७ टक्के एवढा आहे. तर, आज ६ हजार ०८० रुग्ण बरे होऊन घरी देखील गेले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९२ हजार ८९७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आता अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत देखील मोठी वाढ होत आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ६२ हजार ०३१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९३.३६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६७ लाख ७६ हजार ०५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख ०८ हजार ५८६ (१३.१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाक २८ हजार ६७६ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर ४ हजार ५१४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण ५२ हजार ४४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.