राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर ! आकडा १० हजारांच्या पार
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर ! आकडा १० हजारांच्या पार

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात एकूण १० हजार २१६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २० लाख ५५ हजार ९५१ झाली आहे. त्याच वेळी राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ५२ हजार ३९३ इतका झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज दिवसभरात राज्यात एकूण ६ हजार ४६७ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये लक्षणं असलेले आणि लक्षणं नसलेले अशा दोन्ही प्रकारच्या कोरोनाबाधितांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता अवघी ८८ हजार ८३८ इतकी राहिली आहे. यामध्ये सर्वाधिक १८ हजार ४०१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यामध्ये असून मुंबईत ९ हजार ५५ रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. नागपूरमध्ये देखील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ११ हजार ५५२ वर पोहोचली आहे.

दरम्यान, आजपर्यंत राज्यात १ कोटी ६६ लाख ८६ हजार ८८० व्यक्तींची करोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी २१ लाख ९८ हजार ३९९ व्यक्ती अर्थात चाचणी केल्यापैकी १३.१७ टक्के व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.