राज्यात आजही ३६० कोरोनाग्रस्त मृत्यूंची नोंद; रिकव्हरी रेट ९५.४८
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात आजही ३६० कोरोनाग्रस्त मृत्यूंची नोंद; रिकव्हरी रेट ९५.४८

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येत असला तरी मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. राज्यात दिवसभरात एकूण १० हजार ६९७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. शुक्रवारपेक्षा ही संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसत आहे. तर राज्यात आज ३६० कोरोनाग्रस्त मृत्यूंची नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या ५८ लाख ९८ हजार ५५० इतकी झाली आहे. मात्र, त्याचवेळी यातले ५६ लाख ३१ हजार ७६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९५.४८ टक्के इतका झाला आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्याभरापासून राज्यामध्ये टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमवीर राज्याच्या काही भागामध्ये जनजीवन काही प्रमाणात का होईना, सुरळीत सुरू झालं असून काही भागांमधले निर्बंध वाढले आहेत. तर दुसरीकडे कोरोनाच्या रोजच्या आकडेवारीमध्ये देखील बदल घडताना दिसत आहेत.