राज्यात दिवसभरात ४७ रूग्णांचा करोनामुळे मृत्यू; रूग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत घट
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात दिवसभरात ४७ रूग्णांचा करोनामुळे मृत्यू; रूग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत घट

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र अद्याप कायम आहे. राज्यात दिवसभरात ४७ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत घट झाल्याचे समोर आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज कोरोनाबाधित रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. कालच्या दिवसभरात राज्यात १ हजार ८४२ नवे कोरनाबाधित रुग्ण आढळले आले होते. आज मात्र ही संख्या २४ तासांत २ हजार ४०५ वर पोहोचली आहे. करोनामुळे राज्यात ४७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २० लाख १३ हजार ३५३ वर पोहोचली आहे.

राज्यात ४३ हजार ८११ सक्रिय रूग्ण आहेत. तर, आतापर्यंत ५० हजार ८६२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. दिवसभरात महाराष्ट्रात २ हजार १०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.२४ टक्के इतके झाले आहे. आतापर्यंत राज्यात १९ लाख १७ हजार ४५० जणांनी कोरोनावर मात केली आहे.