कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात दिवसभरात २ हजार ७१६ जण कोरोनामुक्त; ४१ मृत्यू

मुंबई : राज्यात आज दिवसभरात २ हजार ७१६ रुग्ण कोरोनामधून बरे झाले असून २ हजार ६९२ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ४१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख ८० हजार ६७० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.२८ टक्के एवढे झाले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६५ लाख ५९ हजार ३४९ झाली आहे. तर राज्यात आजपर्यंत १लाख ३९ हजार २०७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ९२ लाख २२हजार २६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ५९ हजार ३४९ (११.०८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४३ हजार १५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १ हजार ३८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३५ हजार ८८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *