कोरोना इम्पॅक्ट बातमी

मोठी बातमी : दिवसभरात राज्यातील १० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई : आज दिवसभरात राज्यात १० हजार ३६२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, २ हजार ७६५ नवे कोरोनाबाधित आढळले. आतापर्यंत राज्यात १८ लाख ४७ हजार ३६१ जण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १९ लाख ४७ हजार ११ झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९४.८८ टक्के आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज दिवसभरात राज्यात करोनामुळे २९ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात एकूण ४९ हजार ६९५ जण कोरोनामुळे दगावले आहेत. तर, सद्यस्थितीस राज्यात ४८ हजार ८०१ अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यातील करोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला नसताना, आज कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण राज्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३० लाख ४ हजार ८७६ नमुन्यांपैकी १९ लाख ४७ हजार ११ (१४.९७ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४१ हजार ७२८ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ३ हजार ७८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.