कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात दिवसभरात ३,२७६ कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद; ५८ मृत्यू

मुंबई : राज्यात आज दिवसभरात ३ हजार २७६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, राज्यात ३ हजार ७२३ रूग्ण कोरोनामधून बरे झाले असून ५८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख ६० हजार ७३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२४ टक्के एवढे झाले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५ लाख ४१ हजार ११९ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १लाख ३८हजार ८३४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ७९ लाख ९२ हजार १० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ४१ हजार ११९ (११.२८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ५९ हजार १२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १ हजार ४८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३७ हजार ९८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *