कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात दिवसभरात ३ हजार ५३० नवीन करोनाबाधित; ५२ मृत्यू

मुंबई : राज्यात आज दिवसभरात ३ हजार ५३० नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ३ हजार ६८५ रूग्ण बरे झाले. याशिवाय, ५२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख १२ हजार ७०६ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०६ टक्के एवढे झाले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६५ लाख ०४ हजार १४७ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १ लाख ३८हजार २२१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ६२ लाख २५ हजार ३०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ०४ हजार १४७ (११.५७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९६ हजार १७६ व्यक्ती गृहविलगिकरणात आहेत. तर १ हजार ८७५ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४९ हजार ६७१ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *