२४ तासांत ५८ हजार ९९३ कोरोनाबाधित; मृत्यूचा आकडा ३०० पार
कोरोना इम्पॅक्ट बातमी

२४ तासांत ५८ हजार ९९३ कोरोनाबाधित; मृत्यूचा आकडा ३०० पार

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस तो अधिकच वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागील २४ तासांत राज्यात ५८ हजार ९९३ नवीन कोरोनाबाधित आढळले असून मृत्यूचा आकडाही ३००पार गेला आहे. २४ तासांत कोरोनामुळे एकूण ३०१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर १.७४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५७ हजार ३२९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ५ लाख ३४ हजार ६०३ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

दरम्यान, आज ४५ हजार ३९१ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण २६ लाक ९५ हजार १४८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.९६ टक्के एवढे झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कठोर पावलं उचलत राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाउनची घोषणा देखील केली आहे. मात्र तरी देखील कोरोनाबाधितांचा संख्या वाढतच आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी १६ लाख ३१ हजार २५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३२ लाक ८८ हजार ५४० (१५.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २६ लाक ९५ हजार ०६५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४ लाक १५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.