राज्यातून कोरोनाची धक्कादायक आकडेवारी; आज आढळले एवढे नवे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातून कोरोनाची धक्कादायक आकडेवारी; आज आढळले एवढे नवे रुग्ण

मुंबई : राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. मागील २४ तासांत राज्यात ६ हजार ९७१ करोनाबाधित वाढले असुन, ३५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी राज्यभरातील नागरिकांबरोबरच सरकार व प्रशासनाची देखील चिंता वाढवणारी आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता २१ लाख ८८४ वर पोहचली आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात २ हजार ४१७ जण कोरोनातून बरे झाले. तर, एकूण १९ लाख ९४ हजार ९४७ जणांनी कोरोनामुक्त झालेले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ५२ हजार ९५६ असुन, आजपर्यंत ५२ हजार ९५६ रुग्णांचा राज्यभरात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्के आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या १,५७,२०,२५९ (१३.३६ टक्के) नमुन्यांपैकी २१ लाख ८८४ नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४२ हजार ५६३ जण गृहविलगीकरणात तर १ हजार ७३२ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

दरम्यान, मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. अनेक शहारांमध्ये संचारबंदी तर काही ठिकाणी लॉकडाउनची देखील घोषणा करण्यात आलेली आहे. याशिवाय राज्य सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहेत.