दिलासादायक ! राज्यात आज १५ हजार २७७ रूग्ण कोरोनामुक्त
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यात आज १५ हजार २७७ रूग्ण कोरोनामुक्त

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे बोलले जात असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ही कधी कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. मागील २४ तासात राज्यभरात १५ हजार २७७ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, ७ हजार ६०३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, राज्यात ५३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ५९ लाख २७ हजार ७५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.१५ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ४१ लाख ८६ हजार ४४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१ लाख ६५ हजार ४०२ (१३.९५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८२ हजार ४७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार ६५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १ लाख ०८ हजार ३४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोरोनाची दुसरी लाट येऊन सहा महिने पूर्ण होत असतानाही अद्याप महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याचं चित्र आहे. राज्यातील आकडेवारीने पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता वाढवली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या १० दिवसांत महाराष्ट्र आणि केरळमध्ये गेल्या १६ महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ पहायला मिळाली आहे. महाराष्ट्रात फक्त गेल्या १० दिवसांत तब्बल ७९ हजार ५९५ नवे रुग्ण आढळले आहेत.