राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात पुन्हा वाढ; १६५ रूग्णांचा मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात पुन्हा वाढ; १६५ रूग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली, तरी धोका कायम आहे. शिवाय, कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. काल कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही कोरोनाबाधितांपेक्षा जास्त होती. तर, आज पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या कोरोनातून बरे झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली आहे. मागील २४ तासांत राज्यात ८ हजार १५९ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ७ हजार ८३९ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय राज्यात आज १६५ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख ०८ हजार ७५० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत १ लाख ३० हजार ९१८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ६० लाख ६८ हजार ४३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ३७ हजार ७५५ (१३.५४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५१ हजार ५२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३ हजार ७९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९४ हजार ७४५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.