राज्यात पुन्हा ८७५३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात पुन्हा ८७५३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या दैनंदिन रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येते आहे. शुक्रवारी राज्यात ८७५३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात १५६ कोरोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यात आज ८,३८५ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. राज्यात दिवसभरात ८ हजार ८५३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख ३६ हजार ९२० रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.०१ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आज २५२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यात १ लाख १६ हजार ८७६ कोरोनाबाधित रुग्ण उपचाराधीन आहेत. तर राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्या करण्यात आलेल्या ४ कोटी २० लाख ९६ हजार ५०६ कोरोना चाचण्यांपैकी ६० लाख ७९ हजार ३५२ (१४.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख २४ हजार ७४५ करोना बाधित होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ४,४७२ बाधित संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.