राज्यात ९ हजार ३५० नवीन कोरोनाबाधितांची नोंद; तर ३८८ मृत्यूंची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात ९ हजार ३५० नवीन कोरोनाबाधितांची नोंद; तर ३८८ मृत्यूंची नोंद

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रोजच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशात वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये रोज आढळणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांची संख्या ५०-६० हजारांवरून १० हजारांपर्यंत खाली आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र, दररोज ही आकडेवारी सातत्याने कमी होताना न दिसता मध्येच वाढतानाही दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात झालेल्या कोरोना मृत्यूंची संख्या थेट ३८८च्या घरात गेली आहे. सोमवारी हाच आकडा २००इतका नोंदवण्यात आला होता. तिथे दुसरीकडे नव्या कोरोनाबाधितांचा आकडा देखील कालच्या ८ हजार १२९ वरून जवळपास १२०० नी वाढून ९ हजार ३५० पर्यंत गेला आहे.