राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट; पाहा आकडेवारी
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट; पाहा आकडेवारी

मुंबई: देशात कोरोनाची दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरत असल्याचं दिलासादायक चित्र आहे. राज्यातही गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट झाली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.७६ टक्के एवढं झालं आहे. राज्यात एका दिवसात ९ हजार १०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५७ लाख १९ हजार ४५७ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे मागच्या २४ तासात ९ हजार ३६१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच १९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यातील मृत्यूदर सध्या १.९७ टक्के इतका आहे. राज्यात सध्या १ लाख ३२ हजार २४१ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत ३ कोटी ९५ लाख १४ हजार ८५८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५९ लाख ७२ हजार ७८१ जणांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

सध्या राज्यात ७ लाख ९६ हजार २९७ जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ४ हजार ६८३ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूरमध्येही करोना रुग्णांच्या संख्या कमी होत आहे.