राज्यात ९८१२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; तर राज्यात विक्रमी लसीकरण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात ९८१२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; तर राज्यात विक्रमी लसीकरण

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्राला चांगलाच फटका बसला. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. राज्यात कोरोनाच्या रोजच्या आकडेवारीमध्ये सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. शुक्रवारी १५६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर आज (शनिवार) १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आज दिवसभरात ८ हजार ७५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आजपर्यंत महाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ५७ लाख ८१ हजार ५५१ इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी ९५.९३ टक्के इतके झाले आहे. ही आरोग्य यंत्रणांसाठी आणि राज्य सरकारसाठी देखील दिलासादायक बाब ठरली आहे.

आज राज्यात ९,८१२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता ५७ लाख ८१ हजार ५५१ झाली आहे. तसेच राज्यात आज १७९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.० टक्के आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ०८ लाख ३१ हजार ३३२ नमुन्यांपैकी ६० लाख २६ हजार ८४७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख २८ हजार २९९ रुग्ण घरी उपचार घेत आहेत. तर ४ हजार २७२ रुग्ण संस्थात्मक क्कारंटाईन आहेत.

राज्यात विक्रमी लसीकरण
लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. राज्यात शनिवारी ७ लाख ०२ हजार ४३२ जणांचे लसीकरण झाले. हा आतापर्यंतचा विक्रमी आकडा आहे. आतापर्यत राज्यात ३ कोटी ०९ लाख ७९ हजार ४६९ जणांना लस देण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली आहे.