दिलासादायक ! कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट; आज केवळ एवढ्या रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट; आज केवळ एवढ्या रुग्णांची नोंद

मुंबई : कोरोनाच्या बाबतीत आज एक दिलासादायक बातमी असून आज राज्यात केवळ ३ हजार ८३७ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर आज ८० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५९% एवढा आहे. आज कोरोनावर मात केलेल्या नव्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. आज एकूण ४१९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ८५ हजार १२२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३९% एवढा झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ०८ लाख ५६ हजार ३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख २३ हजार ८९६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ३५ हजार ५३० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर ६ हजार ३५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. मुंबईत १५ हजार ४७३ रुग्ण अॅक्टिव आहेत. तर, ठाणे १६ हजार १९१ कोरोनाबाधित रुग्ण अॅक्टिव आहेत.

दरम्यान, देशात आणि संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावानं मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातही चिंता वाढवली होती. पण आजच्या आकड्यांनी दिलासा मिळाला असून मागील काही दिवसांच्या तुलनेत कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडले आणि काही अंशी झालेल्या बेजबाबदार वर्तनामुळं पुन्हा एकदा काहीसा नियंत्रणात येणारा कोरोना फोफावला होता.