राज्यात कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण ९५.५८ टक्क्यांवर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण ९५.५८ टक्क्यांवर

मुंबई : राज्यात कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण ९५.५८ टक्क्यांवर पोहोचले असून ही दिलासादायक बाब आहे. राज्यात आज देखील दिवसभरात आढळलेल्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुपटीहून कितीतरी अधिक असल्याचे दिसून आले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आज २ हजार ९९२ नवे कोरोनाबाधित आढळले तर ७ हजार ३० जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे आतापर्यंत राज्यातील कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या १९ लाख ४३ हजार ३३५ झाली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.५८ टक्के आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २० लाख ३३ हजार २६६ झाली आहे. याशिवाय आज दिवसभरात राज्यात ३० रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली. तर, आजपर्यंत राज्यात करोनामुळे ५१ हजार १६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३७ हजार ५१६ आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४७,६४,७४४ नमुन्यांपैकी २० लाख ३३ हजार २६६ नमूने (१३.७७ टक्के) पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात १ लाख ८२ हजार १८१ जण गृह विलगीकरणात तर २ हजार ९३ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.