महाराष्ट्राच्या या गावात संध्याकाळी नेमकं काय घडतं, का केले जातात मोबाईल बंद? कारण वाचून व्हाल थक्क
पश्चिम महाराष्ट्र बातमी

महाराष्ट्राच्या या गावात संध्याकाळी नेमकं काय घडतं, का केले जातात मोबाईल बंद? कारण वाचून व्हाल थक्क

सांगली जिल्ह्यातील एका गावात डिजिटल प्रभावापासून वाचवण्यासाठी एक अनोखा प्रयोग राबवण्यात आला आहे. या गावात संध्याकाळी सात वाजले की लोकं आपला मोबाईल, टीव्ही आणि इतर गॅजेट्स बंद करतात. विशेष म्हणजे यासाठी मंदिरातून सायरन वाजवला जातो.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कडेगाव तालुक्यातील 3 हजार 105 लोकसंख्येचं मोहित्यांचे वडगाव ताकारी योजनेमुळे बागायती झालं आहे. हातात उसाचा पैसा आल्याने मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे वळली. याचा परिणाम जिल्हा परिषदेतील शाळेच्या पटसंख्येवर झाला. तर कोरोना काळात मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. याचा विचार करण्यासाठी सरपंच विजय मोहिते यांनी 14 ऑगस्ट रोजी महिलांची आमसभा बोलावली. यावेळी महिलांनी मुलांच्या अभ्यासाचा विषय मांडला. मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या अभ्यासासाठी रोजचा दीड तास निश्चित करण्यात आला.

या निर्णयाची आठवण करून देण्यासाठी मंदिरावर भोंगाही बसविण्यात आला आहे. रोज सायंकाळी सात वाजता भोंगाही वाजतो. सर्व मुलं ही घरी पोहचतात आणि अभ्यास करतात. त्यांचे पालक सुद्धा आपल्या पाल्यांचे अभ्यास करून घेतात. त्याच बरोबर महिला ह्या स्वयंपाक आणि विविध पुस्तक वाचन करतात. या अनोख्या प्रयोगामुळे मोबाईलमूळे कुटूंबातील हरवलेला संवाद पुन्हा सुरु झाला आहे.