महाराष्ट्र युवक काँग्रेसचा मोठा निर्णय; हेल्पलाईन योद्ध्यांसाठी मेडिक्लेम इन्शुरन्स!
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्र युवक काँग्रेसचा मोठा निर्णय; हेल्पलाईन योद्ध्यांसाठी मेडिक्लेम इन्शुरन्स!

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सुरू केलेल्या कोरोना हेल्पलाईनमध्ये जे पदाधिकारी व कार्यकर्ते फ्रंटलाइन वॉरियर्स आहेत, त्या सर्वांना 1 लाख रुपयांपर्यंतचा मेडिक्लेम इन्शुरन्स पुरवण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेशााध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जाहीर केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्ष स्थापन करून राज्यभरात जिल्हानिहाय हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. रुग्णांना बेड मिळवून देणे, औषध उपलब्ध करणे, आयसीयू, व्हेंटिलेटरचे बेड मिळवून देणे अशी अनेक कामांमध्ये राज्यातील रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत होत आहे.

महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या कोरोना हेल्पलाईनमध्ये काम करणारे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते हे माझ्यासाठी फ्रंटलाईन योद्धे आहेत. ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाव्हायरसग्रस्त रूग्णांना व त्यांच्या नातलगांना मदत करत आहेत. सध्याच्या दुसऱ्या लाटेत मध्ये काम करताना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे युवक काँग्रेसच्या फ्रंटलाईन योद्ध्यांना आम्ही रुपये एक लाख पर्यंतचा मेडिक्लेम विमा देणार आहोत अशी माहिती अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

गेल्यावर्षीही लॉकडाऊनमध्ये मदतकार्य करताना महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर मेडिक्लेम देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सत्यजित तांबे यांनी दिली.