राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकार कडून मोठं गिफ्ट
महाराष्ट्र

राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकार कडून मोठं गिफ्ट

राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकार कडून मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्य सरकारने काल विधिमंडळाच्या अधिवेशनात आपला आर्थिक लेखापरीक्षण अहवाल सादर केला. त्यात गेल्या आर्थिक वर्षात राज्याचा विकास 9.1 टक्क्यांनी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. आगामी काळात राज्यात अनेक नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. हा काळ राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचा असेल. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली चांगली घोषणा पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकार कडून मोठं गिफ्ट

– शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा मिळणार, शेतकऱ्यांचा पीकविमा हप्ता राज्य सरकार भरणार
– मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक सिंचन योजना
– गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटींची तरतूद
– अपघातग्रस्त शेतकऱ्यांना २ लाख रुपये मिळणार
– धान उत्पादकांना हेक्टरी १५ हजारांची मदत जाहीर
– गोपीनाथ मुंडे अपघात योजना जाहीर; देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा
– अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात; प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी १८०० रुपये देणार
– विदर्भ, मराठवाड्यातील १४ आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत