अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट; आज केवळ २४९८ नवे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट; आज केवळ २४९८ नवे रुग्ण

पुणे : राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत आज मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दिवसभरात ४ हजार ५०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून केवळ २ हजार ४९८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात आज ५० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५७ टक्के इतका झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आत्तापर्यंत एकूण १८ लाख १४ हजार ४४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९४.४ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २५ लाख ४३ हजार ७७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख २२ हजार ४८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात सध्या ४ लाख ५२ हजार ५३५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार १३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ५७ हजार १५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९ लाख २२ हजार ४८ झाली आहे.