मुंबई : राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट झाली असून सातत्याने अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. दिवसभरात कोरोनातून बरे झाल्याने एकूण ५ हजार ५७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण १८ लाख २० हजार २१ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
या आकडेवारीनुसार राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.५४ टक्के इतका झाला आहे. राज्यात आज ३ हजार १८ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात आज ६८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर हा २.५६ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली.
राज्यात आज 3018 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5572 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1820021 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 54537 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.54% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 29, 2020
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २६ लाख ७५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख २५ हजार ६६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या २ लाख ८९ हजार ५६० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार २०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ५४ हजार ५२७ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ३,०१८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९ लाख २५ हजार ६६ झाली आहे.