राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट; रिकव्हरी रेट ९४ टक्के
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट; रिकव्हरी रेट ९४ टक्के

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाची नव्याने साथ आली असली तरी राज्यात मात्र कोरोच्या अॅक्टिव्ह रुग्णांत सातत्याने घट होताना दिसत आहे. राज्यात आज दिवसभरात ४ हजार १२२ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आज राज्यात ३ हजार १०६ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. परंतु राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी धोका मात्र कायम आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आत्तापर्यंत एकूण १७ लाख ९४ हजार ८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९४. ३ टक्के इतका झाला आहे. तर राज्यात आज ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर आज घडीला २.५७ टक्के इतका आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २२ लाख १२ हजार ३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख २ हजार ४५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ९४ हजार ८१५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार ६६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आज घडीला राज्यात ५८ हजार ३७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आज एकूण ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे.