राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ; आज केवळ १४२७ रुग्णांना डिस्चार्ज
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ; आज केवळ १४२७ रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे. तर महाराष्ट्रात आज केवळ १४२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज राज्यात ३ हजार ४३१ नव्या रुग्णांचे निदान झाले असून राज्यात मागील २४ तासांमध्ये ७१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १८ लाख ६ हजार २९८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९४.४ टक्के इतका झाला आहे. आज पर्यंत राज्यातला मृत्यू दर २.५७ टक्के इतका आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २४ लाख १ हजार ६३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख १३ हजार ३८२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ७७ हजार ५८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार ६९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला ५६ हजार ८२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.