कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५० हजारांच्या उंबरठ्यावर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५० हजारांच्या उंबरठ्यावर

मुंबई : राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही आता ५० हजारांच्या उंबरठ्यावर आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४९ हजार ८९७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आज 3729 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3350 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 18 लाख 56 हजार 109 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 51 हजार 111 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.78% झाले आहे. आजपर्यंत करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात तपासण्यात आलेल्या १,३१,९९,२०१ नमुन्यांपैकी १९ लाख ५८ हजार २८२ (१४.८४टक्के)नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख ७० हजार २१७ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, २ हजार ८२४ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

त्याचबरोबर, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उद्या महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हयांमध्ये ३ आरोग्य संस्था व प्रत्येक महानगरपालिकेमध्ये १ आरोग्य संस्था याठिकाणी ड्राय रन घेण्यात येणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.