कोरोनाग्रस्तांची आकडा पुन्हा ४ हजारांच्या वर; दिवसभरात ८७ मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाग्रस्तांची आकडा पुन्हा ४ हजारांच्या वर; दिवसभरात ८७ मृत्यू

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी झालेला दिसत असला तरी आणखी धोका टळला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण, मागील २४ तासांत ४ हजारांपेक्षा जास्त म्हणजेच ४ हजार २६८ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात २४ तासांत एकूण ८७ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील मृत्यू दर सध्या २.५७ टक्के इतका आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर राज्यात आज दिवसभरात २७७४ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील एकूण १७ लाख ४९ हजार ९७३ रुग्णांनी आत्तापर्यंत कोरोनावर मात केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९३.४६ टक्के झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १५ लाख ७० हजार १३७ नमुन्यांपैकी १८ लाख ७२ हजार ४४० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ३२ हजार २८८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ५ हजार १२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ७३ हजार ३१५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.