दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यातील नव्या रुग्णांची घटली; राज्यात २४ तासात एवढे रुग्ण

मुंबई : सलग काही दिवसांपासून नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ होत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली असून आज (ता. २८) नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. राज्यात मागील २४ तासात ५ हजार ९६५ करोना रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. राज्यात आज घडीला ८९ हजार ९०५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागील २४ तासात ३ हजार ९३७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत राज्यात १६ लाख ७६ हजार ५६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९२.४ टक्के झाले आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

मागील २४ तासात राज्यात ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर आहे २.५९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७ लाख २२ हजार १९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख १४ हजार ५१५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला ५ लाख २८ हजार ४६२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ७ हजार ११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.