राज्यातील नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या घटली; अॅक्टिव्ह रुग्णही लाखाच्या आत
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या घटली; अॅक्टिव्ह रुग्णही लाखाच्या आत

मुंबई: राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. गेल्या २४ तासांत एकूण ६ हजार ७५३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. या बरोबरच आज एकूण ५ हजार ९७९ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज दिवसभरात एकूण १६७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या १६७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख २२ हजार ४८५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के एवढे झाले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या लाखाच्या खाली आली असून ती ९४ हजार ७६९ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १५ हजार ८०९ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ११ हजार ४९२ इतके रुग्ण आहेत.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ६४ लाख ४६ हजार ३६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ५१ हजार ८१० (१३.४६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५२ हजार ७०२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३ हजार ६५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.