बिर्याणी तो बहाना है! मकसद दलित अधिकारी टार्गेट करना है!
पुणे बातमी

बिर्याणी तो बहाना है! मकसद दलित अधिकारी टार्गेट करना है!

पुणे : पुण्यातील पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल माध्यमांवर फिरत आहे. त्यासोबतच विविध टीव्ही माध्यमांवर ही बातमी दाखवून नारनवरे यांना टार्गेट करत त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा हेतू स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे यावर स्वतः पोलिस उपायुक्त नारनवरे यांनी खुलासा केला असून त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्यात येत आहे. दलित महिला अधिकारी असल्याने त्यांच्याविरुद्ध बदनामीचे षडयंत्र होत असल्याचे सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रीतम गायकवाड यांनी म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यापूर्वी उस्मानाबाद, ठाणे, जालना आणि औरंगाबाद या ठिकाणी विशेष उल्लेखनीय कार्यामुळे त्यांचा सन्मान सुद्धा झाला आहे. मात्र राज्यात प्रामाणिक अधिकाऱ्यांना एखाद्या फेक प्रकरणात बदनामी करून खच्चीकरण करण्याचे काम सुरु आहे. राज्यात इतर गंभीर प्रश्न असताना फक्त एका महिला अधिकाऱ्याला टार्गेट करण्यासाठी माध्यमांचा वापर करत इतकं मोठं षढयंत्र रचले जात असल्याचा आरोपही प्रीतम गायकवाड यांनी केला आहे.

बिर्याणीसारख्या विषयावर कोणताही अधिकारी ६ मिनिट कसे बोलेल. इतका साधा प्रश्न प्रत्येकाला पडेल असे ती क्लिप ऐकल्यानंतर लक्षात येईल. आपल्या मर्जीतले अधिकारी त्या ठिकाणी आणण्यासाठी ही खेळी केल्याचे स्पष्ट दिसत आहे. राजकारण्यांचा हस्तक्षेप आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या लॉबीमुळे महाराष्ट्रातील दलित अधिकाऱ्यांना साईडपोस्ट देऊन खच्चीकरण करण्याचे काम सुरु आहे. याबाबत प्रीतम गायकवाड यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देऊन पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांची चौकशी रद्द करण्याची मागणी केली आहे.

पुण्यामध्ये कर्तव्यावर रुजू झाल्यावर मराठीतील महत्वाच्या सकाळ माध्यम समूहानेदेखिल नारनवरे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना दुर्गा असे संबोधले असल्याची आठवणही प्रीतम गायकवाड यांनी करुन दिली. गायकवाड म्हणाले, ‘सकाळ माध्यम समूहाने नारनवरे यांची दखल घेत एकप्रकारे त्यांच्या कार्याचा गौरवच केला होता. एखादे महत्वाचे माध्यम अशा अधिकाऱ्यांची दखल घेत असताना अशा प्रकारे नारनवरे यांना टार्गेट करणे चुकीचे आहे.