उधारीचे पैसे मागितले म्हणून मित्रानेच केला मित्राचा खून
बातमी मुंबई

उधारीचे पैसे मागितले म्हणून मित्रानेच केला मित्राचा खून

मुंबई : उधारीचे पैसे मागितले म्हणून मित्रानेच हत्या केल्याचा प्रकार वसईत उघडकीस आला आहे. भोलेनाथ गोस्वामी असे मयत तरुणाचे नाव आहे. ९ दिवसांपासून तो बेपत्ता होता. त्याचा मृतदेह मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या जंगलात आढळून आला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मयत भोलेनाथ गोस्वामी (वय ३६) हा तरुण उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात राहतो. त्याच्याच गावात राहणार्‍या मुकेश गुप्ता या मित्राला त्याने १ लाख रुपये व्याजाने दिले होते. ते पैसे गोस्वामी मुकेशकडे मागत होता. दरम्यान, गोस्वामी रक्षाबंधन सणानिमित्त नाालसोपारा येथे राहणार्‍या मामाच्या घरी आला होता. तेथून २७ ऑगस्ट पासून तो बेपत्ता झाला होता. त्याचा तपास नालासोपारा येथील तुळींज पोलीस करत होते.

या तपासादरम्यान पोलिसांनी मुकेश गुप्ता याला ताब्यात घेतले. त्याने चौकशीत गोस्वामीची हत्या करून मृतदेह मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बापाणे गावाजवळ टाकल्याचे सांगितले. हा गुन्हा वालीव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.