पोटच्या चार मुलींना मारून पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न
देश बातमी

पोटच्या चार मुलींना मारून पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली : पोटच्या चार अल्पवयीन मुलींना पाण्यात बुडवून मारल्यानंतर पित्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या पोशाला गावात घडली आहे. ३० वर्षीय बापाने मुलींना पाण्यात बुडवून मारण्यापूर्वी विष दिल्याचीही संतापजनक बाब समोर आली आहे. शेजाऱ्याने त्याला पाण्यात उडी घेताना पाहिल्यानंतर पोलिसांना कळवलं. या घटनेत आरोपी पूर्खा राम बचावला आहे. तर, झिओ (९), नोजी (७), हिना (३) आणि दीड वर्षाची लासी या चारही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आरोपीने त्याच्या चारही मुलींना घराबाहेर असलेल्या १३ फूट खोल पाण्याच्या टाकीत फेकून दिले आणि नंतर उडी घेतली. त्याच्या शेजाऱ्याने त्याला उडी मारताना पाहिले आणि त्यांनी पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत चारही मुलींचा बुडून मृत्यू झाला होता. मुलींचे मृतदेह जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. तर पुरखा रामला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पुरखा रामच्या पत्नीचा ५ महिन्यांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. पत्नीच्या मृत्यूनंतर तो व्यथित झाला होता. त्याला त्याच्या मेहुणीशी लग्न करायचे होते जेणेकरून त्याच्या मुलींना आई मिळेल. पण यासाठी त्याच्या सासऱ्यांनी मंजुरी दिली नाही. त्यामुळे त्याने मुलींसह स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.