अल्पवयीन मुलीसह एकाच कुटुंबातील चार जणींवर बलात्कार
देश बातमी

अल्पवयीन मुलीसह एकाच कुटुंबातील चार जणींवर बलात्कार

दौसा : एका अल्पवयीन मुलीसह एकचा कुटुंबातील चार जणींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. विष्षू गुर्जर असं आरोपीचं नाव असून पीडित कुटुंबाच्या घराजवळच त्याचा ढाबा आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आरोपी एक वर्ष कुटुंबातील एका महिलेवर लैंगिक अत्याचार करत होता. आरोपीने महिलेच्या लहान बहिणी आणि मुलीलाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. महिलेला याची माहिती मिळताच तिने पोलीस गाठलं आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

महिलेने तक्रार दिल्यानंतर कुटुंबातील इतर महिला पुढे आल्या आणि आरोपीविरोधात तक्रार दिली. आरोपीविरोधात याआधी २३ आणि २४ जानेवारीला बलात्काराच्या दोन तक्रारी दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.